Site icon साप्ताहिक एकच ध्येय

मुंबई पोर्ट ट्रस्ट रुग्णालयाचं, झोडीयाक हॅलोट्रॉनिक्स कडे हस्तांतरण करताना, सर्व कलमांचे पालन करावं- मुंबई उच्च न्यायालय

मुंबई : मुंबई पोर्ट ट्रस्ट रुग्णालयाचं, झोडीयाक हॅलोट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड कडे हस्तांतरण करताना, दोन्ही पक्षांमध्ये झालेल्या करारांच्या सर्व कलमांचं पूर्णपणे पालन करावं असे निर्देश, मुंबई उच्च न्यायालयानं, झोडीयाकला दिले आहेत.

मुंबई पोर्ट ट्रस्ट सोबत गेल्या वर्षी झालेल्या करारामधल्या अनेक कलमांची पूर्तता, झोडीयाक हॅलोट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेडनं केली नसल्यानं, मुंबई पोर्ट ट्रस्ट मधल्या दोन्ही प्रमुख कामगार संघटनांनी  मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर काल झालेल्या सुनावणीत, न्यायालयानं हा निर्णय दिला.

मुंबई पोर्ट ट्रस्टमधले 35 हजार पेन्शनर्स,  6 हजार कार्यरत कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय मिळून एक लाख लोक या रुग्णालयामधून वैद्यकीय सेवा घेत असल्यामुळे, त्यांना या निर्णयाचा मोठा लाभ होणार असल्याची प्रतिक्रिया, दोन्ही कामगार संघटनांचे सरचिटणीस आणि मुंबई पोर्ट ट्रस्टचे विश्वस्त  सुधाकर अपराज आणि केरसी पारेख यांनी निवेदनाद्वारे व्यक्त केली आहे.

Exit mobile version