पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा जाहीर केलेल्या वेळापत्रकाप्रमाणेच घेण्यात येणार
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नाशिक इथल्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातल्या विविध विद्याशाखांच्या पदवी पूर्व परीक्षा स्थगित करण्यात आल्याची माहिती विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी दिली.
मात्र पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा विद्यापीठाने यापूर्वी संकेतस्थळावर जाहीर केलेल्या वेळापत्रकाप्रमाणेच घेण्यात येणार आहेत.अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यात येऊ नये, या मागणीसंदर्भातलं प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असल्यानं या परीक्षेसंदर्भात न्यायालयाच्या निकालानंतरच निर्णय होण्याची शक्यता आहे.
परीक्षा घेण्यात येऊ नये या मागणीच्या दोन याचिका आणि पदव्युत्तर अंतिम वर्षाच्या परीक्षा लवकर घेण्यात याव्यात या मागणीसाठी एक याचिका अशा एकूण तीन याचिका परीक्षेच्या अनुषंगाने झालेल्या असून, तीनही याचिकांबाबत उच्च न्यायालयात ३१ जुलैला सुनावणी होणार आहे. त्या निर्णयानंतरच सविस्तर आदेश काढण्यात येईल , असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
तोपर्यंत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी, नर्सिंग, भौतिकोपचार आदी विद्या शाखांच्या पदवीपूर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत.