नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चौथ्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धांचं पुढील वर्षी हरयानामधील पंचकुला इथं आयोजन केलं जाणार आहे. केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू आणि मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी काल दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून ही घोषणा केली.
पुढील वर्षी होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिक नंतर खेलो इंडिया ही स्पर्धा घेतली जाणार आहे. खेलो इंडिया क्रीडा स्पर्धा साधारणतः जानेवारीमध्ये घेतल्या जातात. मात्र कोविडच्या साथीमुळे या स्पर्धा लांबणीवर टाकाव्या लागल्याचं रिजिजू यांनी स्पष्ट केलं.