पुणे : पुणे महसूल विभागातील जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक, पोलिस उपायुक्त यांच्या दिनांक २५ व २६ जुलै २०१९ या दोन दिवसांच्या कार्यशाळेचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील ५ वा मजला येथे करण्यात आले आहे.
या कार्यशाळेत दिनांक २५ जुलै २०१९ रोजी सकाळी १० ते १०.२० वाजता पुणे महसूलचे उपायुक्त उपस्थितांचे स्वागत व प्रस्ताविक करणार आहेत. सकाळी १०.२० ते १०.४५ वाजता कार्यशाळेत मार्गदर्शन विभागीय आयुक्त करणार असून सकाळी १०.४५ ते दुपारी १२ वाजता सामान्य प्रशासनचे उपायुक्त संजयसिंह चव्हाण हे महाराष्ट्र पोलिस अधिनियम अंतर्गत कलम ५५,५६,५७ प्रमाणे हद्दपार प्रकरणांबाबत मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी १२ ते दुपारी १ वाजता सेवानिवृत्त अधिकारी पी.ई. गायकवाड यांचे हद्दपार विषयक कामकाजाबाबत मार्गदर्शन. दुपारी १ ते दुपारी २ वाजता कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई हे आपत्ती व्यवसथापन अधिनियम २००५ बाबत मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी २.४५ ते दुपारी ३.४५ वाजेपर्यंत सोलापूरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले हे सन २०१४ ते २०१९ राज्य शासनाकडुन MLRC,Tenancy अंतर्गत करण्यात आलेल्या सुधारणा, धोरण, निर्णय याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी ३.४५ ते दुपारी ५ वाजेपर्यंत केंद्रशासनाचे कृषि व पशुसंवर्धनविषयक धोरण व कृषि उत्पन्न वाढ या चर्चासत्रात कृषी आयुक्त सुहास दिवसे, सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी, साताराचे जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांचा सहभाग असणार आहे.
दिनांक २६ जुलै २०१९ रोजी सकाळी ९३० ते सकाळी १०.३० वाजेपर्यंत पुणे नगररचानाचे सहसंचालक अविनाश पाटील हे प्रादेशिक आराखडयाचे अनुषंगाने महसूल अधिका-यांचे कामकाजाविषयी चर्चा करणार आहेत. सकाळी १०.३० ते दुपारी ११.३० वाजेपर्यंत साखर आयुक्त शेखर गायकवाड हे महसूल अधिकारी यांचे समोरील अर्धन्यायिक कामकाज, कार्यपध्दती व भूमिका या विषयी माहिती देणार आहेत. दुपारी ११.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत७/१२ संगणकीकरण, ओडीसी/ १५५/डी-४ संगणकीकरणाचे अनुषंगाने झालेल्या बदलामुळे तलाठी/ सं.अ.दप्तर तपासणी बाबतची कार्यपध्दती यामध्ये पुणे जमाबंदी आयुक्त एस चोक्कलिंगम, राज्य समन्वयक रामदास जगताप, जमाबंदी आयुक्त कार्यालयाचे रा.भु.आ.आ.का यांचा सहभाग असणार आहे. दुपारी१ ते दुपारी २ वाजेपर्यंत Art of Writing of Judgement (TNC Act, Ceiting Act, MLRC 36A,Devasthan etc.) उपविभागीय अधिकारी यांनी दिलेल्या निर्णयांचे निरीक्षण या विषयी न्यायिक सदस्य व्ही.बी. कुलकर्णी हे माहिती देणार आहेत. दुपारी २.३० ते ३.१५ वाजेपर्यंत प्रशासकीय कार्यामध्ये संवाद कौशल्याचे महत्व नाशिक विभागाचे महसूल उपायुक्त दिलीप स्वामी हे माहिती देणार आहेत. दुपारी ३.१५ ते ३.४५ वाजेपर्यंत जिल्हाधिकारी नवल किशोर राम हे प्रधानमंत्री आवास योजना नागरी व ग्रामीण या विषयी माहिती देणार आहेत. दुपारी ३.४५ ते दुपारी ४ पर्यंत चर्चा, प्रश्नोत्तरे होणार असून कार्यशाळेचा समारोप दुपारी ४ ते दुपारी ४.१५ वाजता होणार आहे.