Site icon साप्ताहिक एकच ध्येय

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी महासंचालनालयाचे छापे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबई विमानतळाच्या निधीत झालेल्या ७०५ कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं जीव्हीके ग्रुप, MIAL अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मर्यादित, आणि इतरांच्या चौकशीअंतर्गत आज अनेक ठिकाणी छापे टाकले. MIAL ही सरकारी-खाजगी भागिदारीतली कंपनी आहे.

खर्चाच्या रकमा फुगवून दाखवून हा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. त्यासंदर्भात मनी लाँड्रिंग कायद्याणंतर्गत ईडी कारवाई करत आहे. त्यात मुंबई आणि हैदराबाद इथं या दोन्ही कंपन्या आणि इतरांच्या कार्यालयासह नऊ ठिकाणी छापे टाकल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

Exit mobile version