नवी दिल्ली : ग्रीड संलग्न पवन उर्जा प्रकल्पातून उर्जा खरेदीसाठी मूल्य आधारित स्पर्धात्मक बोली प्रक्रियेसाठीची मार्गार्दर्शक तत्वे 8 डिसेंबर 2017 ला अधिसूचित करण्यात आली. बोईचा अनुभव आणि संबंधीतांशी चर्चा करून त्यावर आधारित यामध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार-
पवन उर्जा प्रकल्पासाठी भू संपादनासाठी 7 महिन्याऐवजी 18 महिने असा कालावधी करण्यात आला आहे.ज्या राज्यात भू संपादनासाठी दीर्घ काल लागत आहे अशा ठिकाणच्या पवन उर्जा विकासकाला याचा लाभ होणार आहे.
पवन उर्जा प्रकल्पाच्या सी यु एफ घोषित क्षमता आढावा खिडकीसाठीची मुदत तीन वर्षे करण्यात आली आहे.
किमान सी यु एफ पेक्षा कमी उर्जा निर्मितीसाठीचा दंड आता पीपीए मुल्याच्या 50 टक्के निश्चित करण्यात आला आहे.
भू संपादनाबाबतची गुंतवणूक जोखीम कमी करण्याबरोबरच प्रकल्प जलदगतीने सुरु करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या सुधारणा करण्यात आल्या आहेत.