Site icon साप्ताहिक एकच ध्येय

लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार, शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांना जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पुण्यातल्या लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने दिला जाणारा यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार, लडाखमधील विख्यात शिक्षणतज्ज्ञ आणि शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांना दिला जाणार आहे. एक लाख रुपये; स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.

दरवर्षी लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीदिनी, म्हणजे दि. १ ऑगस्ट रोजी पुण्यात एका विशेष समारंभात पुरस्काराचं वितरण होतं. मात्र यावर्षी कोरोना संकटामुळे त्यादिवशी कार्यक्रम होणार नाही, मात्र परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर योग्य नियोजन करून पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला जाईल, असे डॉ. दीपक टिळक यांनी सांगितले.

Exit mobile version