Site icon साप्ताहिक एकच ध्येय

आशा वर्कर्सचा साडीचोळीची भेट देऊन त्यांचा सन्मान केला जाणार

मुंबई (वृत्तसंस्था) : चंद्रपूर जिल्ह्यात आशा वर्कर्सचा ११०० रुपये रोख रक्कम आणि ४०० रुपयांची साडीचोळीची भेट देऊन त्यांचा सन्मान केला जाणार आहे. मदत आणि पुनर्वसन, आणि ईतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी ही माहिती दिली.

कोरोनासारख्या संकट काळातही आशा वर्कर’नी दारारदारात जाऊन नागरिकांची तपासणी करण्याचे प्रामाणिक कर्तव्य बजावले आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याचा सन्मान करण्यासाठी “रक्षा बांधनाच्या” दिवशी आम्ही जिल्ह्यातील २४०० आशा वर्कर्सना ही भेट देणार असल्याचं त्यांनी संगितलं.

Exit mobile version