Site icon साप्ताहिक एकच ध्येय

गाडी सुरक्षितपणे चालवण्यासाठी चालकांना प्रशिक्षण

नवी दिल्ली : केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 नुसार,चालकांना प्रशिक्षण हे चालकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणेही उत्तम वाहनचालक कौशल्य आणि रस्ते नियमावलीचे ज्ञान पुरवत असते. वाहन चालक प्रशिक्षण आणि संशोधन आदर्श संस्था (आयडीटीआर), प्रादेशिक वाहन चालक प्रशिक्षण केंद्र (आरडीटीसी) आणि वाहन चालक प्रशिक्षण केंद्र (डीटीसी) जिल्हा स्तरावर स्थापन करण्याच्या योजनेची केंद्र सरकार अंमलबजावणी करत आहे.

त्यानुसार महाराष्ट्रातल्या पुणे, लातूर आणि नागपूर  इथे डीटीआय आणि आयडीटीआर तर वर्धा,नांदेड,सांगली आणि नागपूर साठी आरडीटीसी मंजूर करण्यात आले आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली.

Exit mobile version