Site icon साप्ताहिक एकच ध्येय

मार्च 2018 – मार्च 2019 या काळात 22 लाखापेक्षा जास्त एमएसएमईची नोंदणी

नवी दिल्ली : देशातल्या उद्योग आधार पोर्टलवर मार्च 2018 ते  मार्च 2019 या काळात 22.83 लाख  एमएसएमईची नोंदणी  झाली.

पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, पत हमी योजना यासारख्या योजनांमधून एमएसएमई मंत्रालय, सूक्ष्म आणि लघु उद्योगांना वित्त पुरवठा उपलब्ध करून देते.

सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी, केंद्र सरकारने पत हमी विश्वस्त निधी सुरु केला असून या उद्योगांना याद्वारे तारण रहित कर्ज उपलब्ध करून देण्यात येते.

केंद्रीय सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

Exit mobile version