शाळा बंद असल्या तरी माध्यान्ह भोजन योजनेचा भत्ता विद्यार्थ्यांना देण्याचे केंद्र सरकारचे आदेश
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा अजूनही बंद असल्या तरी शालेय विद्यार्थ्यांचं आरोग्य आणि त्यांना आवश्यक असलेल्या पोषक आहाराची गरज लक्षात घेऊन त्यांना माध्यान्ह आहार योजनेसाठी मिळणारा भत्ता द्यावा अशी सुचना केंद्र सरकारनं सर्व संबंधित यंत्रणांना केली आहे.
शालेय विद्यार्थ्यांना शिजवलेलं पौष्टिक अन्न देण्यासाठी येणारा एकूण खर्च जमेस धरून त्यानुसार भत्ता द्यावा असंही सरकारनं स्पष्ट केलं आहे.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ही माहिती दिली. शाळा पुन्हा सुरू झाल्यानंतर माध्यान्ह आहार योजना पूर्ववत सुरू होईल असंही त्यांनी नमूद केलं.