Site icon साप्ताहिक एकच ध्येय

लॉकडाऊन काळात ५७४ सायबर गुन्हे दाखल; २९० जणांना अटक

मुंबई : लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये समाजमाध्यमांचा गैरवापर करून आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी ५७४ विविध गुन्हे महाराष्ट्र सायबरने दाखल केले असून २९० व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती ‘महाराष्ट्र सायबर’च्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिली.

आक्षेपार्ह संदेश, पोस्टर्स, व्हिडिओ, ट्विट पोस्टस, शेअर केल्याप्रकरणी दि. ३१ जुलैपर्यंत प्लॅटफॉर्मनिहाय गुन्हे खालीलप्रमाणे-

■ व्हॉट्सॲप-  २११ गुन्हे दाखल

■ फेसबुक पोस्ट्स –  २४६ गुन्हे दाखल

■ टिकटॉक व्हिडिओ-  २८ गुन्हे दाखल

■ ट्विटर – आक्षेपार्ह ट्विट – १८ गुन्हे दाखल

■ इंस्टाग्राम – चुकीच्या पोस्ट-  ५ गुन्हे

■ अन्य सोशल मीडिया (ऑडिओ क्लिप्स, युट्यूब) गैरवापर –  ६६ गुन्हे दाखल

■ वरील सर्व गुन्ह्यांमध्ये आतापर्यंत २९० आरोपींना अटक.

■  ११८ आक्षेपार्ह पोस्ट्स समाजमाध्यमांवरून हटविण्यात यश

■ जळगाव जिल्ह्यातील  शनिपेठ पोलीस स्टेशनमध्ये एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे त्यामुळे या विभागातील गुन्ह्यांची संख्या ३७ वर गेली आहे.

■ सदर गुन्ह्यातील आरोपीने कोरोना महामारीच्या काळात सोशल मीडियावर  राजकीय  व धार्मिक वक्तव्य  असणारा व्हिडिओ टाकला  होता. त्यामुळे लोकांमध्ये गोंधळ निर्माण होऊन  परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकला असता.

Exit mobile version