Site icon साप्ताहिक एकच ध्येय

देशातील महामारीच्या व्यवस्थापनासाठी लागणारी आवश्यक संसाधने आणि साथीच्या तीव्रतेचा अंदाज वर्तविण्यासाठी जेएनसीएएसआर वैज्ञानिकांनी मॉडेल विकसित केले

नवी दिल्ली : देशभर असलेल्या महामारीच्या व्यवस्थापनात, आठवडा ते महिना या काळात होणाऱ्या संसर्गाच्या संभाव्य संख्येचा अंदाज लावणे आणि या आकड्याचा वापर करून देशातील प्रत्येक जिल्ह्यात आरोग्याची काळजी घेण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टींचे पूर्वानुमान लावणे आवश्यक आहे. भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाअंतर्गत असलेली एक स्वायत्त संस्था, जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर अडव्हान्स सायन्टिफिक रिसर्च (जेएनसीएएसआर), आणि भारतीय विज्ञान संस्था (आयआयएससी) यांनी मिळून कोविड-19 चा प्रारंभिक टप्प्याच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी आणि धोरण ठरविण्यासाठी एक मॉडेल विकसित केले आहे.

या मॉडेलचा उपयोग आवश्यक असलेल्या वैद्यकीय बाबींच्या यादीचे आकलन करण्यासाठी केला जाऊ शकतो, ज्याची चाचणी क्षमता तपासणे आणि गंभीर सुविधांचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे. जो मृत्यूदर कमी करण्यासाठी आवश्यक आहे. कोविड–19 काळात हा अतिशय उपयुक्त ठरू शकतो. कारण रोगाचा प्रसार आणि लोकांच्या वर्तणुकीची पद्धती बदलते आणि रोगाचा प्रसार, व्यवस्थापनाची कार्यक्षमता बदलते आणि त्यांच्यावर परिणाम करते, त्यामुळे त्याबाबतचे अंदाज मिळणे आवश्यक असते.

हे मॉडेल मापदंडातील अनिश्चितता दर्शविते. संक्रमणाबाबत दोन स्वतंत्र अंदाज बांधण्यासाठी नोंदवलेले मृत्यू आणि संक्रमण झालेले, अशा प्रकारे एखाद्याला भविष्यातील संक्रमणाबाबत झालेल्या बदलांमधील वैविध्याचा अंदाज लावता येईल.

या पथकाने हे सिद्ध केले आहे की, या दृष्टीकोनातून देशभरात रोगाच्या उत्क्रांतीसाठी सार्वत्रिकीकरण केले आहे, ज्याचा कालांतराने विश्वासार्ह अंदाज बांधण्यासाठी वापर केला जाऊ शकतो. यादृष्टीने या साथीच्या काळात आयसीयू, पीपीई यासारख्या अत्यावश्यक असलेल्या साधनांबाबतचे नियोजन करता येऊ शकते. सुलभतेसाठी आणि काळानुसार अनुकूलतेसाठी हे मॉडेल बनविण्यात आले आहे.

इटली, न्यूयॉर्क या ठिकाणी संक्रमितांची आणि मृत्यूची संख्या याचा अंदाज व्यक्त करीत या मॉडेलची चाचणी घेण्यात आली होती, प्रत्यक्ष आलेल्या निकालाच्या बऱ्याच जवळ हा अंदाज व्यक्त झाल्याचे लक्षात आले. अशाच पद्धतीचा अभ्यास भारतात देखील करण्यात आला, जिथे संक्रमण आणि मृत्यूची संख्या दर्शविण्या व्यतिरिक्त, एखाद्या ठिकाणी रुग्णालयात दाखल होण्यासाठी आवश्यक साहित्याच्या गरजेचे देखील भाकित करण्यात आले होते.

कोविड-19 च्या काळात गणिती पद्धतीचे मॉडेल आणि प्रतिकृती, नियोजन आणि निर्णय क्षमता ही प्रमुख साधने आहेत. “हे उदाहरण सर्वोत्कृष्ट संशोधन गटांमध्ये स्पर्धा करण्याऐवजी सहकार्याची ताकद पुढे आणते,“ असे डीएसटीचे सचिव प्रा. आशुतोष शर्मा म्हणाले.

Exit mobile version