नवी दिल्ली : उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला देशातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
संदेशाचा संपूर्ण मजकूर खालीलप्रमाणे आहे –
“रक्षाबंधनाच्या शुभप्रसंगी मी आपल्या देशातील जनतेला माझ्या शुभेच्छा देतो.
रक्षाबंधन दिनी संपूर्ण भारतात आणि जगभरात भाऊ-बहिणींमधील पवित्र नात्याचा सन्मान केला जातो. हा सण भाऊ-बहिणींना एकत्र बांधणारे प्रेम आणि आपुलकीचे संबंध अधिक दृढ करतो.
या शुभ प्रसंगी, आपल्या समाजातील महिलांना पारंपारिकरित्या देण्यात आलेला सन्मान आणि आदर कायम राखण्याचा संकल्प करूया आणि महिलांना त्यांच्या क्षमतेचा पूर्ण वापर करण्यासाठी सक्षम बनवूया.
हा सण आपल्या देशात शांतता, सुसंवाद आणि समृद्धी घेऊन येवो. ”