पिंपरी : यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) च्या वतीने संस्थेच्या चिंचवड येथील कॅम्पसमध्ये ‘कारगिल विजय दिवस’ साजरा करण्यात आला. या प्रसंगी शौर्य चक्र विजेते मधुसूदन सुर्वे यांच्याशी झालेल्या अनौपचारिक गप्पांमधून कारगिल विजय लढाईच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. तसेच त्यांनी यावेळी आपल्या लष्करी जीवनातील काही अनुभवसुद्धा सांगितले. यावेळी सुभेदार मेजर भागवत शिंदे यांनीही त्यांच्या सैन्यदलातील आठवणी सांगितल्या. तर भारतीय सैन्याच्या तीनही दलातील जवानांविषयी प्रत्येक नागरिकाने कृतज्ञता बाळगली पाहिजे.
अतिशय संघर्षमय प्रसंगीही ठामपणे भारतीय सैन्य आपल्या देशाचे संरक्षण करीत आहे, त्यांचा त्याग, बलिदान हा कधीही न विसरता येण्याजोगा आहे अशा शब्दांत इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) संस्थेचे संचालक डॉ. मिलिंद मराठे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी संस्थेचे संस्थेचे प्रा.सारंग दाणी, अनिकेत जोशी, आदिती चिपळूणकर, अंजली धकाते, अभिजित चव्हाण, राहुल कोल्हापुरे, योगेश रांगणेकर यांच्यासह सर्व प्राध्यापक व अन्य कर्मचारी उपस्थित होते. पवन शर्मा यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमासाठी शुभांगी सरोटे यांनी विशेष सहकार्य केले.