Site icon साप्ताहिक एकच ध्येय

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत राम मंदिराचं भूमीपूजन झालं

नवी दिल्ली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज अयोध्येत राम मंदिराचं भूमीपूजन केलं. सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालानुसार आरक्षित जागेवरच्या राम मंदिरासाठी हे भूमीपूजन करण्यात आलं.

संस्कृत मंत्रोच्चारात, सुरक्षित शारिरीक अंतराचं पालन करत, मास्क परिधान करुन या कार्यक्रम आज पार पडला. यावेळी प्रधानमंत्र्यांनी श्री राम जन्मभूमी मंदिराच्या टपाल तिकिटाचंही अनावरण केलं.

यावेळी सरसंघचालक मोहन भागवत, उत्तरप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे महंत नृत्य गोपाल दास यावेळी उपस्थित होते.

यापूर्वी प्रधानमंत्र्यांनी हनुमानगढी येथे जाऊन हनुमानाचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी पारिजातचं वृक्षारोपण केलं. यावेळी साध्वी उमा भारती, बाबा रामदेव यांच्यासह देशभरातले सुमारे १३५ संत महंत मिळून १७५ निमंत्रित उपस्थित होते.

Exit mobile version