आता सोने आणि दागिन्यांच्या तारण मूल्याच्या 90% पर्यंत कर्ज घेता येणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतात आणि जगभरात कोविड-19 च्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय रिझर्व्ह बँकेने पैशांचा ओघ सुधारण्यासाठी आणि वित्तीय व्यवस्थेला अधिक सहाय्य पुरवण्यासाठी अतिरिक्त विकासात्मक आणि नियामक धोरण उपाययोजना आज जाहीर केल्या.
गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की, “गेल्या 100 वर्षातील सर्वात भयानक अशा आरोग्य आणि आर्थिक संकटांमुळे” उद्भवलेला आर्थिक ताण कमी करण्यास या उपाययोजनांमुळे मदत होईल.
घोषणांचा सारांश पुढीलप्रमाणे