पंतप्रधान उद्या ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत उच्च शिक्षणातील परिवर्तनात्मक सुधारणांवरील परिषदेत ’ उद्घाटनपर भाषण करणार
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, 7 ऑगस्ट 2020 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत उच्च शिक्षणातील परिवर्तनात्मक सुधारणांवरील परिषदेत ‘ उद्घाटनपर भाषण करणार आहेत.
मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि विद्यापीठ अनुदान आयोगाद्वारे या परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे.
या परिषदेत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, 2020 अंतर्गत समग्र, बहु-शाखात्मक आणि भविष्यातील शिक्षण, दर्जेदार संशोधन, आणि शिक्षण सर्वदूर पोहोचण्यासाठी तंत्रज्ञानाचा न्याय्य वापर यासारख्या शिक्षणाच्या महत्त्वपूर्ण पैलूंसाठी समर्पित सत्रे असतील.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक , केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री संजय धोत्रे हे देखील या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या विविध पैलूंवर राष्ट्रीय शिक्षण धोरण मसुदा समितीचे अध्यक्ष आणि सभासद, तसेच प्रख्यात शैशिक्षणतज्ञ / वैज्ञानिक यांच्यासह अनेक मान्यवर आपले विचार मांडतील.
या कार्यक्रमात विद्यापीठांचे कुलगुरू, संस्थांचे संचालक आणि महाविद्यालयाचे प्राचार्य आणि इतर हितधारक सहभागी होतील.
हा कार्यक्रम पुढील माध्यमातून थेट प्रसारित केला जाईल.