Site icon साप्ताहिक एकच ध्येय

राज्यात एनडीआरएफच्या १५ तुकड्या तैनात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या १५ तुकड्या विविध शहरात पाठवण्यात आल्या आहेत. मुंबई मध्ये ५, कोल्हापूरला ४,सांगलीत २, सातारा, ठाणे, पालघर आणि नागपूर या ठिकाणीप्रत्येकी एक तुकडी रवाना करण्यात आली असल्याचं एनडीआरएफनं कळवलं आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातल्या नद्याधोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. चिपळूण आणि राजापूर तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. रायगड जिल्ह्यात  आजही पावसाचा जोर कायम असून जिल्ह्यातल अनेक ठिकाणी नद्यांनी धोक्याची पातळी गाठली आहे.

(या बाबपाऊस आणि पुरानं दोघांचे बळी घेतले आहेत. महाडमध्ये सावित्रीचं पाणी कमी झालं असलं तरी कुंडलिका धोक्याच्या खुणेवरून वाहत आहे. जिल्हयातल्या इतर नद्याही दुथडी भरून वाहत आहेत. जिल्हयातील पूरस्थिती गंभीर बनली असल्याने मदत आणि बचावासाठी पेण इथं एनडीआरएफचं एक पथकं तैनात केलं आहे. महाडमध्ये तट रक्षक दलाचं पथक तैनात केलं आहे. रायगड जिल्ह्यात गेल्या २४ तासात २०९ पूर्णांक ५ शतांश मिलीमीटर पाऊस झाला असून येत्या दोन दिवसात जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार असल्यानं जनतेनं काळजी घ्यावी, असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे.)

पालघर जिल्ह्यात आजही पावसानं जोरदार हजेरी लावली. जिल्ह्यातल्या बऱ्याच भागांमधे रात्रभर जोरदार पाऊस पडला. सकाळी पावसाचा जोर वाढल्यानं बऱ्याच ठिकाणचे  नाले भरून वाहत होते. अनेक ठिकाणचे रस्ते पाण्याखाली गेले असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. आता मध्यम स्वरूपाचा पाऊस सर्वत्र सुरू आहे. जिल्ह्यात आज सरासरी ६३ पूर्णांक ९ दशांश मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

पालघर जिल्हयात आजही वादळी वाऱ्यसह मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तविली आहे. मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केलं आहे.

सातारा जिल्ह्यात काल सकाळपासून आज सकाळी ८ वाजेपर्यंत एकूण सरासरी ३७ पूर्णांक ७ दशांश मिलिमीटर पाऊस झाला. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात आज सकाळपर्यंत कोयना इथं २०२, नवजा इथं २४५, तर महाबळेश्वर इथं १८३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातल्या प्रमुख धरणांची पाणी पातळी वाढली असून कोयना धरणात आज ६० पूर्णांक ५३ शतांश टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे.

सांगली जिल्ह्यात दमदार पाऊस सुरू आहे. कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. सांगली जवळ कृष्णा नदीची पाणी पातळी २० फूट इतकी झाली.

शिराळा तालुक्यात चांदोली परिसरातही मुसळधार पाऊस सुरू आहे.  वारणा धरण ८० टक्के भरलं आहे. वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असून, काखे मांगले आणि कोकरूड रेठरे पुल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे या भागातली वाहतूक ठप्प झाली आहे.

पावसाचा जोर कायम राहिला तर पाण्याचा विसर्ग वाढू शकतो, त्यामुळे वारणा नदी काठच्या ग्रामस्थांना सावधानता बाळगण्याच्या सूचना प्रशासनानं दिल्या आहेत.

Exit mobile version