एफएसीटी मध्ये जुलै 2020 दरम्यान 24,016 मेट्रिक टन विक्रमी खत उत्पादन
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रसायन आणि खते मंत्रालयांतर्गत फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लिमिटेड (एफएसीटी) ने वर्षभरात उत्पादन आणि विक्रीतील विक्रम मोडले आहेत.
एफएसीटीच्या निवेदनानुसार, कंपनीने जुलै 2020 दरम्यान अमोनियम सल्फेट’ चे (24,016 मेट्रिक टन) सर्वाधिक मासिक ‘उत्पादन करत 23,811 मेट्रिक टन या जानेवारी 2020 मधील यापूर्वीच्या सर्वाधिक उत्पादनाला मागे टाकले.
एफएसीटी प्रामुख्याने दक्षिण भारतीय बाजारासाठी एनपी 20:20:0:13 (फॅक्टॅमफोस) आणि अमोनियम सल्फेट या दोन खत उत्पादनांची निर्मिती करत आहे.
कोविडच्या काळात सुरक्षित कार्यवाहीसाठी कंपनी आपले परिचालन वेळापत्रक, कच्चा माल नियोजन, लॉजिस्टिक्स आणि उत्पादन वाहतूक यांमध्ये योग्य संयोजन आखून आपले खत उत्पादन वाढवू शकली.