Site icon साप्ताहिक एकच ध्येय

महाराष्ट्र सायबर मध्ये इंटर्नशीपची सुवर्ण संधी

मुंबई : महाराष्ट्र सायबर मध्ये पात्र उमेदवारांकडून इंटर्नशीपसाठी अर्ज मागवित आहे. पात्र उमेदवारांनी Twitter@MahaCyber1 वरील जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे आपला बायोडाटा pi2.cpaw-mah@gov.in  या ईमेलवर अथवा स्पीड पोस्टव्दारे दि. 12/08/2020 पर्यंत पाठवावा.

यासाठीचा पत्ता : The Special Inspector General of Police, Maharashtra Cyber, 32nd floor, World Trade Center, Cuffe Parade, Mumbai-400 005

इंटर्नशीपसाठी नियम, अटी व शर्ती खालील प्रमाणे आहेत.

उमेदवारास संगणकीय तांत्रिक ज्ञान असावे व त्याचे इंग्रजी व मराठी भाषेवर प्रभुत्व असावे. संभाषण व लेखन कौशल्य असावे.

असे महाराष्ट्र सायबर विभाग, विशेष पोलीस महानिरीक्षक यांचेमार्फत कळविण्यात आले आहे.

Exit mobile version