जम्मू-काश्मीरमध्ये २०० परिचारिकांची नियुक्ती करण्याचे आदेश – मनोज सिन्हा
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू आणि काश्मीरमध्ये २०० परिचारिकांची ताबडतोब नियुक्ती करण्याचे आदेश या केंद्रशासित प्रदेशाचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी दिले आहेत.
सिन्हा यांनी काल श्रीनगरमधील रुग्णालयाला भेट दिली असता, तिथे विलगीकरण कक्षात पुरेशा संख्येनं परिचारिका उपलब्ध नसल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी हे आदेश दिले.