Site icon साप्ताहिक एकच ध्येय

जागतिक हत्ती दिनानिमित्त प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते पोर्टल, दस्ताऐवजाचं अनावरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक हत्ती दिनाच्या पार्श्वभूमीवर आज  केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते एका पोर्टलचं आणि एका दस्ताऐवजाचं अनावरण करण्यात आलं. हत्तींच्या संरक्षणासाठी या दस्ताऐवजामध्ये  उपाय योजना सुचविण्यात आल्या आहेत.

मानव आणि हत्ती यांच्यातील संघर्ष कमी करून हत्तींची जोपासना करण्यासाठी आणि हत्तीविषयी जागरुकता निर्माण होणं गरजेचं असल्याचं जावडेकर यांनी यावेळी सांगितलं. हत्ती हा बुद्धीमान प्राणी असून आपल्या देशाच्या संस्कृतीत आपण जनावारांची हत्या करत नाही असंही ते म्हणाले.

भारतात आज हत्तींची संख्या वाढत असून ती ३० हजारांच्या जवळपास असल्याचं केंद्रीय पर्यावरण आणि वन राज्यमंत्री बाबूल सुप्रियो यांनी या प्रसंगी सांगितलं. आशियाई आणि आफ्रिकन हत्तीची संख्या वेगाने घटत असल्यानं, २०१२ पासून दरवर्षी बारा ऑगस्ट रोजी  जागतिक हत्ती दिन साजरा केला जातो.

Exit mobile version