Site icon साप्ताहिक एकच ध्येय

लोकसभा निवडणूक 2019 मध्ये दिव्यांगांना सहभागी होता यावे यावर निवडणूक आयोगाने दिलेला भर यशस्वी

नवी दिल्ली : देशात 2019 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकात दिव्यांगाना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यावर निवडणूक आयोगाने विशेष भर दिला.

मतदानाच्या दिवशी दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना कोणत्या गोष्टींची आवश्यकता भासेल हे लक्षात घेऊन, त्यांना ती मदत पुरवण्यात आली. सर्व मतदान केंद्रांवर व्हील चेअरची तसेच दिव्यांग जनांना सोयीचा ठरणाऱ्या रॅम्पची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. दिव्यांगाच्या नोंदणीसाठी त्यांच्या घरापर्यंत पोहोचणारे अभियान निवडणूक आयोगाने राबवले होते. सुलभ नोंदणीसाठी विशेष मोबाईल ॲपही विकसित करण्यात आले होते.

दृष्टीबाधितांसाठी ब्रेल लिपीतली चिन्हंही इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावर होती, अशी सोय प्रथमच करण्यात आली होती.

याशिवाय रांगेतल्या मतदारांसाठी पिण्याचे स्वच्छ पाणी, सावली, शौचालय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. प्राथमिक वैद्यकीय सुविधाही सज्ज ठेवण्यात आल्या होत्या.

Exit mobile version