Site icon साप्ताहिक एकच ध्येय

पार्थ पवार हे राजकारणात नवखे आहेत – नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

मुंबई (वृत्तसंस्था) : पार्थ पवार हे राजकारणात नवखे असल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तसंच अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. पार्थ पवार यांनी अभिनेता सुशांतसिंह मृत्यूप्रकरणी केलेली सीबीआय चौकशीची मागणी आणि पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी त्यावर केलेल्या विधानासंदर्भात भुजबळ बोलत होते. पार्थ यांचे वडील उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाराज नसल्याचंही भुजबळ यांनी नमूद केलं.

दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी आज मंत्रालयात अजित पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. आपल्या लोकसभा मतदार संघातल्या कामांसंदर्भात ही भेट असल्याचं, सुळे यांनी बातमीदारांना सांगितलं.

Exit mobile version