नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी,देशातल्या व्याघ्र गणना 2018 चा निकाल 29 जुलै रोजी लोक कल्याण मार्ग येथे जारी करणार आहेत.
व्याघ्र गणनेसाठीची व्याप्ती,नमुना आणि कॅमेरा ट्रापिंग प्रमाण हे मुद्दे लक्षात घेता हे जगातले सर्वात मोठे वन्य जीव सर्वेक्षण प्रयत्न असल्याचे मानण्यात येत आहे.
भारतात दर चार वर्षांनी व्याघ्र गणना केली जाते. व्याघ्र गणनेची तीन आवर्तने 2006, 2010 आणि 2014 मधे पूर्ण झाली आहेत.
हवामान बदलाचा प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी केंद्र सरकार आणि राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण यांनी वाघांचे इकॉनॉमिक व्हॅल्यूएशन केले आहे.