Site icon साप्ताहिक एकच ध्येय

नि:शुल्क २१ व्या राज्यस्तरीय श्रावणी काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन

भोसरी : नक्षञाचं देणं काव्यमंचतर्फे कवींच्या काव्य लेखनीला धार मिळण्यासाठी “राज्यस्तरीय श्रावणी काव्यलेखन स्पर्धा २०२०” आयोजित केली आहे. कवींना निसर्ग स्वस्थ बसू देत नाही. म्हणुन श्रावण व निसर्ग या विषयांवर कवींनी दोन कविता साध्या पोष्टाने पाठवाव्या. हि स्पर्धा नि:शुल्क काव्यलेखन स्पर्धा आहे.

२१ व्या राज्यस्तरीय श्रावणी काव्यलेखन स्पर्धेतून निवडलेल्या कवितांना व विजेत्यांना रोख रक्कम व स्मृतीचिन्ह, सन्मानपञ, गुलाबपुष्प, श्रीफळ देऊन समारंभापूर्वक सन्मानित करण्यात येते. दरवर्षी या स्पर्धेला संपुर्ण महाराष्टातून प्रचंड प्रतिसाद मिळत आला आहे. सलग या स्पर्धेचे २१ वे वर्षे आहे. प्रत्येक सहभागींना सन्मानपञ व गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात येईल.

आतापर्यंत काव्यमंच तर्फे पाच अखिल भारतीय मराठी नक्षञ महाकाव्यसंमेलन, साठ प्रतिनिधी काव्यसंग्रह प्रकाशन, हजारो काव्यमैफली, शेकडो काव्यबैठका, कार्यशाळा, काव्यसहलींचे आयोजन केले आहे. काव्यमंचच्या संपुर्ण महाराष्टात शाखा कार्यरत आहे. असे अध्यक्ष प्रा राजेंद्र सोनवणे कवी वादळकार यांनी एका पञकाद्वारे कळविले आहे. कवींनी आपल्या कविता ३१ ऑगस्ट २०२० अखेरपर्यंत खालील पत्त्यावर पोष्टाने पाठवाव्या. कविंनी आपला पत्ता, मोबाईल, पिन कोडसह कविता पाठवाव्या.

कविता पाठविण्याचा पत्ता-प्रा.राजेंद्र दशरथ सोनवणे. अध्यक्ष-नक्षञाचं देणं काव्यमंच, साई सदन, ए/३, महालक्ष्मी हाईटस,भोसरी, पुणे ४११०३९.

Exit mobile version