गेल्या एका महिन्यात झाली २३ लाख पीपीई किटची निर्यात
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातून गेल्या एका महिन्यात २३ लाख पीपीई किटची निर्यात केली असल्याची माहिती केंद्रिय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. अमेरिका, ईग्लंड, युएई, सेनेगल आणि स्लोव्हॅनिया या पाच देशांमध्ये ही निर्यात केली गेली आहे.
देशातल्या पीपीई किटच्या उत्पादनाला चालना देण्यासाठी सरकारनं या किटच्या निर्यातीला परवानगी दिली होती. सरकारच्या मेक ईन इंडिया योजनेनुसार देशात होत असलेलं वैद्यकिय उत्पादनं हे आत्मनिर्भर भारत अभियानाच यश असल्याचंही मंत्रालयानं म्हटलं आहे.
राज्यांनी आपल्या निधीतून आतापर्यंत १ कोटी ४० लाख पीपीई किटची खरेदी केल्याचंही मंत्रालयानं सांगितलं.