Site icon साप्ताहिक एकच ध्येय

यूएई-इस्राएल राजनैतिक संबंध प्रस्थापित होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पॅलेस्टाइनला रोखण्यासाठी संयुक्त अरब अमिरात (यूएई) आणि इस्राएल प्रथमच एकत्र आले असल्याचे संकेत मिळाले आहेत. यूएई आणि इस्राएलने परिपूर्ण राजनैतिक संबंध प्रस्थापित करण्याचे मान्य केले आहे, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी जाहीर केले.

ट्रम्प यांनी घोषणा केल्याने इस्राएलशी सक्रिय राजनैतिक संबंध प्रस्थापित करणारे यूएई हे आखातातील पहिले आणि तिसरे अरब राष्ट्र ठरले आहे. अफगाणिस्तानातील युद्ध संपुष्टात आणण्याच्या प्रयत्नांना यश मिळालेले नाही.

त्याचप्रमाणे इस्राएल आणि पॅलेस्टाइन यांच्यात शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांतून कोणताही मार्ग निघालेला नसताना ट्रम्प यांनी वरील घोषणा करणे हा त्यांचा नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वीचा राजनैतिक विजय असल्याचे मानले जाते.

Exit mobile version