स्वातंञ्यदिनी काव्यप्रेमी उद्योजक सुनिलभाऊ नाथे नागपूर यांच्या शुभहस्ते ई मासिक प्रकाशन सोहळा ऑनलाईन संपन्न
Ekach Dheya
पुणे : नक्षञाचं देणं काव्यमंच पुणे यांच्या तर्फे दर महिन्याला प्रकाशित होणाऱ्या चौथ्या “काव्यातील नक्षञ” या ई मासिकाचा प्रकाशन सोहळा १५ ऑगस्ट स्वातंञ्यदिनी ऑनलाईन उत्साहात संपन्न झाला.
कवींच्या हक्काचे सन्मानानाचे व्यासपीठ नक्षञाचं देणं काव्यमंच होय. कवींना आदर सन्मान मिळावा म्हणून स्थापन झाले आहे. २१ वर्षांच्या अखंड वाटचालीत अनेक विविध उपक्रम यशस्वी केले आहे. ई मासिकाच्या माध्यमातुन कवी-कवयिञींना लिहिते करुन, त्यांच्या कवितांना सन्मानाने नि:शुल्क प्रकाशित केले जाते. “काव्यातील नक्षञ” हे विनामूल्य वितरण व प्रकाशन केले जाते. त्यामुळे सर्वांनी यात सहभाग घेऊन अनेकांना पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करावा. या सोहळ्यास पुढील अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्रकाशक सोहळा शुभहस्ते कविवर्य सुप्रसिदध उद्योजक मा.श्री.सुनिलभाऊ नाथे साहेब (स्वागताध्यक्ष-नक्षञाचं देणं काव्यमंच, नागपूर जिल्हा आयोजित दुसरे अखिल भारतीय मराठी नक्षञ महाकाव्य संमेलन २०१२) (सुप्रसिदध अद्योजक, कवी, समाजसेवक, काव्यप्रेमी) (अध्यक्ष-श्री लहानुजी महाराज मंदिर ट्रस्ट,कळमेश्वर जि.नागपूर) यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
प्रकाशन सोहळा विशेष अतिथी माननीय श्री. शंभूदादा पवार,पुणे (सुप्रसिदध उद्योजक,कवी,गौरक्षक), (अध्यक्ष-सह्याद्री युथ फांऊडेशन,महाराष्ट राज्य) उपस्थित होते. प्रकाशन सोहळा प्रमुख पाहुणे मा.कविवर्य संजीव शेरमकर, रोहा, (रायगड जिल्हाअध्यक्ष-नक्षञाचं देणं काव्यमंच) मा.कविवर्य रमेश कांबळे (माणगाव तालुका प्रमुख,रायगड-नक्षञाचं देणं काव्यमंच)
मा.कविवर्य सुजितकुमार कांबळे (पंढरपूर तालुका प्रमुख,सोलापूर -नक्षञाचं देणं काव्यमंच) मा.कविवर्य संतोष रायबान (कट्टर नक्षञ-मंगळवेढा-सोलापुर-नक्षञाचं देणं काव्यमंच) इ. मान्यवर ऑनलाईन उपस्थित राहिले.
प्रकाशन सोहळा प्रमुख पाहुणे मा.कविवर्य श्री शाहू संभाजी भारती (संपादक दै.रयतेचा वाली) मा.कविवर्य अँड. जयराम तांबे (जुन्नर तालुका प्रमुख-नक्षञाचं देणं काव्यमंच) मा.कविवर्या अंजु सोनवणे (चिंचवडगाव विभाग प्रमुख नक्षञाचं देणं काव्यमंच) मा.कविवर्य रामदास घुगंटकर (पुसद तालुका प्रमुख -यवतमाळ-नक्षञाचं देणं काव्यमंच) मा.कविवर्य विनायक विधाटे-पोलीस कवी (शिरुर तालुका विभाग प्रमुख,नक्षञाचं देणं काव्यमंच) यांच्या उपस्थित संपन्न झाला.
यावेळी उदघाटक श्री.सुनिलभाऊ नाथे म्हणाले की, “काव्यमंचची हि काव्य चळवळ संपुर्ण महाराष्टभर वाढली आहे. अनेक दर्जदार उपक्रम राबविणारी हि कार्यक्रम संस्था आहे. याचा मी साक्षीदार आहे. भविष्यातील कवींनी या व्यासपीठात सहभागी होऊन आपल्या काव्याचा विकास करावा. ई मासिकाची संकल्पना आजच्या आधुनिक युगात अत्यआवश्यक आहे. काव्यक्षेञात नवनवीन प्रयोग करणारी हि क्रियाशिल संस्था आहे. या मासिकातील सर्व कविंना सदैव शुभेच्छा”
या उपक्रमाचे संयोजक-संपादक कवी -वादळकार, प्रा.राजेंद्र दशरथ सोनवणे राष्टीय अध्यक्ष नक्षञाचं देणं काव्यमंच यांनी केले. या ई मासिकासाठी शाहु भारती यांनी विशेष परिश्रम घेतले. संपादकीय सल्लागार मंडळाचे विशेष मार्गदर्शन लाभले.