Site icon साप्ताहिक एकच ध्येय

भारतीय रेल्वेतर्फे जगातला सर्वाधिक उंचीचा पूल तयार करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रेल्वेतर्फे जगातला सर्वाधिक  उंचीचा  पूल  तयार  करण्यात  येणार   आहे. मणिपूर राज्यातल्या नोनी  जिल्ह्यात इजाई  नदीवर  हा पुल उभारण्यात येणार  असून  या पुलाच्या सर्वात  मोठ्या खांबाची  उंची   १४१ मीटर  असणार  आहे.

सध्या युरोपातल्या  मोंटेनीग्रोमधला माला-रिजेका वायाडक्ट हा  १३९  मीटर  उंचीचा  पूल जगातला  सर्वाधिक  उंचीचा  पूल मानला  जातो. मणिपूरमध्ये  भारतीय  रेल्वेतर्फे उभारण्यात  येणाऱ्या  या पूलासाठी २८० कोटी  रुपये खर्च  येणार असून  मार्च  २०२२ पर्यंत  या पूलांचं काम पूर्ण  होईल, असं रेल्वेच्या  अधिकाऱ्यांनी  सांगितलं.

Exit mobile version