नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ‘ड्रीम 11’ या ऑनलाईन स्पोर्ट्स फँटसी कंपनीने यंदाच्या IPL स्पर्धेचं प्रायोजकत्व मिळवलं आहे. ‘ड्रीम 11’ ही कंपनी यंदाच्या हंगामासाठी बीसीसीआयला 222 कोटी रुपये देणार आहे. हा करार येत्या डिसेंबर अखेरपर्यंत म्हणजे सुमारे साडेचार महिन्यांचा असल्याची माहिती IPL चे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी दिली.
याआधी ‘विवो’ या चिनी मोबाईल कंपनी बरोबरचा प्रायोजकत्वाचा करार रद्द झाला होता. यंदाची IPL स्पर्धा येत्या १९ सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिरातीत होणार आहे.