राष्ट्रीय भरती यंत्रणा स्थापन करण्याच्या निर्णयाबद्दल पंतप्रधानांकडून आनंद व्यक्त
Ekach Dheya
नवी दिल्ली : राष्ट्रीय भरती यंत्रणा स्थापन करण्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे.
“ही राष्ट्रीय भरती यंत्रणा कोट्यवधी युवकांसाठी वरदान ठरेल,सामाईक पात्रता परीक्षेमुळे अनेक पात्रता परीक्षा देण्याची पद्धत रद्द होईल आणि विद्यार्थ्यांचा अमूल्य वेळ आणि संसाधनांची बचत होईल. या नव्या व्यवस्थेमुळे पारदर्शकतेलाही चालना मिळेल” असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.