Site icon साप्ताहिक एकच ध्येय

अमेरिकेतील वाढत्या बेरोजगारीने सोन्याच्या दरात वाढ

मुंबई : अमेरिकेतील बेरोजगारीच्या दाव्यांमध्ये वाढ झाल्यामुळे स्पॉट गोल्डचे दर वाढून गुरुवारी १९४२ डॉलर प्रति औसांवर बंद झाले. त्यामुळे गुंतवणुकदार सुरक्षित मालमत्ता असलेल्या सोन्याकडे वळाले असल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले.

२८ आणि २९ जुलै २०२० रोजी झालेल्या अमेरिकी फेडरल रिझर्व्ह पॉलिसीच्या बैठकीत मिळालेल्या संकेतानुसार, साथीचा प्रभाव जसजसा विस्तारत आहे, तशा सुधारणेचा मार्ग आणखी खडतर होत आहे. त्यामुळे धोरणकर्त्यांनी अमेरिकी फेडरल रिझर्व्हकडून आणखी प्रोत्साहनपर आधाराची गरज व्यक्त केली. त्यामुळे सोन्याचे दर आणखी मजबूत होतील. सोन्याच्या प्रमुख खाणकाम करणा-या  बॅरिकमध्ये वॉरेन बफे यांच्या बर्कशायर हॅथवेकडून गुंतवणूक झाल्यामुळे सोन्याच्या किंमतींना काहीसा आधार मिळाला.

कच्चे तेल: अमेरिकी अर्थव्यवस्थेत सातत्याने येणा-या कमकुवतपणामुळे तेलाच्या किंमती गुरुवारी ०.८२ टक्क्यांनी घसरून ४२.६ डॉलर प्रति बॅरलवर आल्या. अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने वाढलेल्या चिंतेमुळे तेलाच्या किंमततीवर परिणाम झाला. कोव्हिड-१९ व्हायरसच्या नव्याने प्रसारामुळे तेल बाजारातील सुधारणा मंदावली. आधीपासून अस्थिर असलेल्या या बाजारात सुधारणेची शक्यता आणखी कमी झाली. अमेरिकी धोरणकर्त्यांनी आर्थिक दृष्टीकोन आणि तेल बाजारातील संभाव्य अधिशेष यावर चिंता व्यक्त केली. त्यामुळे तेलाच्या किंमती घसरल्या.

अमेरिकी क्रूड यादीची पातळी १.६ दशलक्ष बॅरल्सनी घसरली. त्यामुळे तेलाच्या किंमती घटल्या. त्यामुळे १४ ऑगस्ट रोजी संपणाऱ्या आठवड्यात मर्यादित राहिल्या. चीनच्या सरकारी मालकीच्या तेल कंपन्यांनी ऑगस्ट २०२० आणि सप्टेंबर २०२० मध्ये अमेरिकी क्रूडचे जवळपास २० दशलक्ष बॅरल बुक केले आहेत, असे अमेरिकेचे तेल व्यापारी, जहाज बांधणारे आणि चिनी आयतदारांच्या अहवालात कळाला. डॉलरची घसरण आणि चीनकडून होण-या मागणीतील वाढ यामुळे क्रूडच्या किंमतीतील घसरण मर्यादित राहिली.

बेस मेटल: फेडरल रिझर्व्हच्या धोरणकर्त्यांनी दिलेल्या खबरदारीच्या इशा-यामुळे बाजारपेठेतील भावनांवर परिणाम झाला. परिणामी गुरुवारी एलएमई बेस मेटलच्या किंमती खाली आल्या. पहिल्या टप्प्यातील व्यापारविषयक आढावा पुढे ढकलण्यात आल्यामुळे अमेरिका-चीन संबंधांमधील अनिश्चितता वाढल्याचे दिसते. जुलै २०२० मध्ये जागतिक प्रायमरी अॅल्युमिनिअमचे उत्पादन २.२९२ दशलक्ष टनांवरून ५.४५२ दशलक्ष टनांवर झाले. त्याचप्रमाणे चीनचे उत्पादनही मागील महिन्यात नोंदवलेल्या ३.०३ दशलक्ष टनांवरून ३.१३१ दशलक्ष टनांवर पोहोचले.

कॉपर: गुरुवारील एलएमई कॉपरचे दर १.२५ टक्क्यांनी घसरून ६६६०१.५ डॉलर प्रति टन एवढे दर कायम राखले. आर्थिक स्थितीच्या सुधारणेभोवतीच्या चिंतेमुळे एलएमई यादीच्या किंमतीत घसरण झाली.

Exit mobile version