Site icon साप्ताहिक एकच ध्येय

देशात कोविड-19 चे रुग्ण बरे होण्याचा दर 74 पूर्णांक 69 शतांश टक्क्यावर

Kochi: Pareed, a 103-year-old COVID-19 patient, who recovered from the disease leaves after being discharged from Kalamassery Medical College Hospital, in Kochi, Tuesday, Aug. 18, 2020. (PTI Photo)(PTI18-08-2020_000147B)

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड-19 चे रुग्ण बरे होण्याचा दर 74 पूर्णांक 69 शतांश टक्के झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं आज ही माहिती दिली. देशात काल 63 हजार 631 रुग्णांना कोविड-19 मधून बरे होऊन घरी परतले.

आतापर्यंत देशभरात 29 लाख 75 हजार 701 रुग्ण कोरोना बाधित झाले, त्यापैकी 22 लाख 22 हजार 577 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.  सध्या देशभरात 6 लाख 97 हजार 330 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आज सकाळी संपलेल्या 24 तासात देशभरात 69 हजार 874 नवे रुग्ण सापडले, तर 945 रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत  या आजारानं देशभरात 55 हजार 794 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोनाचा मृत्यूदर 1 पूर्णांक 87 शतांश टक्के झाला आहे.

Exit mobile version