नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : व्यक्ती किंवा संशयित रुग्णाच्या आवाजावरुन कोरोनाची चाचणी करणाऱ्या व्होकलिस हेल्थकेअर उपक्रमाचा मुंबईत प्रारंभ करण्यात आला. या यंत्रणेद्वारा संशयित रुग्णाच्या आवाजावरुन त्याची कोरोना चाचणी कृत्रिमबुद्धीमत्तेवर आधारित तंत्रज्ञानाचा वापर करुन होणार आहे.
उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे तसंच मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख आणि महापौर किशोरी पेडणेकर यांच्या उपस्थितीत गोरेगावच्या नेस्को सुविधा केंद्रात काल व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उद्घाटन केलं.