Site icon साप्ताहिक एकच ध्येय

लष्करप्रमुखांच्या हस्ते नॅशनल सेक्युरिटी गार्डसच्या 51 स्पेशल ॲक्शन ग्रूपला सीओएएस सन्मान बहाल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांच्या हस्ते आज दहशतवाद विरोधातील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी नॅशनल सिक्युरिटी गार्डसच्या 51 स्पेशल ॲक्शन ग्रूपला सीओएएस सन्मान बहाल करण्यात आला. याप्रसंगी लष्करप्रमुखांनी दलाची क्षमता आणि व्यावसायिकतेची प्रशंसा केली.

लष्करातून 100% मनुष्यबळ घेऊन बनवलेल्या  या दलाने प्रमुख दहशतवादविरोधी दल म्हणून स्वतःला प्रस्थापित केले आहे, आणि अशोक चक्रासह अनेक शौर्य पुरस्कार प्राप्त केले आहेत. अनेक मोहिमांपैकी या गटाची विशेष कामगिरी म्हणजे ऑपरेशन ब्लॅक टोर्नाडो, नोव्हेंबर 2008 मध्ये मुंबई दहशतवाद हल्ल्यावेळी आठ दहशतवाद्यांचा खात्मा करुन, 600 ओलीस नागरिकांना मुक्त केले, यात अनेक परदेशी नागरिकांचा समावेश होता. डिसेंबर 1984 मध्ये स्थापनेपासून 51 स्पेशल अॅक्शन ग्रूपने जगातील नामवंत दहशतवादविरोधी संस्थांमध्ये स्थान मिळवले आहे.

 

Exit mobile version