मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीन महापालिकांच्या कोरोना उपाय योजनांचा घेतला आढावा
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली महापालिका करत असलेल्या कोरोना उपाय योजनांचा आढावा ठाणे पालिका मुख्यालयात घेतला. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि तीनही महापालिकांचे आयुक्त उपस्थित होते.
ठाण्यात ठिकठिकाणी पडलेल्या खड्डयांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली असून, हे खड्डे त्वरित भरावे असे आदेश त्यांनी प्रशासनाला दिली, तर कोरोनामुक्तीकडे वाटचाल करणाऱ्या ठाण्याच्या परिस्थितीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाधान व्यक्त केले असून, मुंब्र्यातील कोरोनाबाबत त्यांनी विशेष माहिती घेतली.
कोरोना उपाय योजनांसाठी ठाण्याला निधीची कमतरता पडू देणार नाही, असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.