Site icon साप्ताहिक एकच ध्येय

नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेडच्या नोएडा कार्यालयाने भिंतींवर वारली चित्रकला साकारली

नवी दिल्‍ली : भारतीय लोक कलेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने खते विभागाच्या अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील एक उपक्रम नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड (एनएफएल) ने नोएडा स्थित आपल्या  कॉर्पोरेट कार्यालयाच्या बाहेरच्या भिंती महाराष्ट्राच्या प्रसिद्ध वारली चित्रकलेने सजवल्या आहेत.

गडद लाल रंगात साकारलेल्या या कलाकृतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. 

नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेडच्या या प्रयत्नाने केवळ आसपासच्या परिसराची शोभा वाढवली नाही तर वारली चित्रकलेप्रति लोकांमध्ये उत्सुकता देखील निर्माण केली आहे. वारली चित्रकला एकतर महाराष्ट्रातील गावांमध्ये साकारली जाते किंवा मोठ्या प्रदर्शनामध्ये पाहायला मिळते. मात्र आता सर्वसामान्य लोकांना  नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेडच्या बाहेरच्या भिंतींवर ही चित्रे पहायला मिळत आहेत.

 

एनएफएल द्वारा जारी निवेदनानुसार , कंपनी स्वच्छ भारत अभियानांतर्गत केंद्र सरकारच्या  स्वच्छता अभियानाला बळकट करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे आणि कंपनीच्या या निर्णयामुळे नोएडाच्या सौंदर्यीकरणाला देखील चालना मिळेल.

कोरोनामुळे उदभवलेल्या  आर्थिक संकटाच्या या काळात  वारली चित्रकारांना देखील या कामातून रोजगार मिळाला आहे.

Exit mobile version