Site icon साप्ताहिक एकच ध्येय

जेएनपीटी आणि इतर टर्मिनल्समध्ये इंटर टर्मिनल रेल्वे हॅण्डलिंग ऑपरेशन संदर्भात सामंजस्य करार संपन्न

मुंबई : देशातल्या अनेक टर्मिनल्सपैकी विशेष समजल्या जाणाऱ्या मुंबईच्या जेएनपीटी बंदराने आयात-निर्यातकांसाठी अधिक गरजेचे असलेले इंटर टर्मिनल रेल हॅण्डलिंग ऑपरेशनसाठी जेएनपीटी व इतर टर्मिनल्समध्ये सांमजस्य करार करुन एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

आयात निर्यात मालाच्या एकत्रित रेल कंटेनरची हाताळणी करण्यासाठी 2007 मध्ये जेएनपीसीटी,एनएसआयसीटी आणि जीटीआय मध्ये इंटर टर्मिनल रेल हँडलिंग ऑपरेशन संदर्भांत सामंजस्य करार झाला होता. तथापि एनएसआयजीटी आणि बीएमसीटी ही दोन नवीन टर्मिनलच्या येण्याने हा सामंजस्य करार निरर्थक झाला होता. तसेच जेएनपीसीटी,एनएसआयसीटी आणि जीटीआय टर्मिनल च्या रेल्वे लाईन्स एकमेकापासून जवळ असून बीएमसीटी रेल्वे लाईन चे अंतर या तीन टर्मिनलपासून साधारण 5 किमी वर आहे. त्यामुळे बीएमसीटी आणि इतर टर्मिनल्समधील मोठ्या अंतरामुळे इंटर टर्मिनल रेल हँडलिंग ऑपरेशन सामंजस्य कराराच्या उपक्रमास मोठा अडथळा ठरत होता त्यासाठी नवीन इंटर टर्मिनल रेल हँडलिंग ऑपरेशन सामंजस्य कराराची आखणी करून त्यास सर्व टर्मिनलची मान्यता प्राप्त झाली असून  त्याची अंमलबजावणी 1 ऑगस्ट 2019 पासून सुरु करण्यात येणार आहे.

इंटर टर्मिनल रेल हँडलिंग ऑपरेशन (आयटीआरएचओ)  कराराचे उद्दीष्ट रेल्वे स्थान निश्चित करणे,उत्पादकता,कार्यक्षमता,खर्च प्रभावी हाताळणी, आयसीडी बॉक्सची आयात वेळ कमी करणे, निर्यातीत आयसीडी बॉक्स संबंधित टर्मिनल्सशी वेळेत जोडणे आणि जेएनपीटी येथे रेल्वे भागाची वाढ करणे हे आहे.

Exit mobile version