Site icon साप्ताहिक एकच ध्येय

आंतरराष्ट्रीय मनुष्यबळ व्यवस्थापन परिषदेच्या उपाध्यक्षपदी विश्वेश कुलकर्णी यांची निवड

पुणे : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल मॅनेजमेंट या भारतातील मनुष्यबळ व्यवस्थापकांच्या राष्ट्रीय पातळीवरील संस्थेचे  राष्ट्रीय अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी यांची एशिया पॅसिफिक फेडरेशन ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट म्हणजेच एपीएफएचआरएम (APFHRM) च्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर अध्यक्षपदी  श्रीलंकेचे धम्मिका फर्नांडो यांची निवड करण्यात आली आहे.  पुढील दोन वर्षांसाठी ही निवड करण्यात आली आहे विश्वेश कुलकर्णी  हे गेल्या ३७ वर्षांपासून मनुष्यबळ व्यवस्थापन क्षेत्रात कार्यरत असून ते राष्ट्रीय अध्यक्षपद भूषवित असलेल्या एनआयपीएम संस्थेत भारतातील विविध औद्योगिक कंपन्यांचे  ४० हजारहून अधिक मनुष्यबळ व्यवस्थापक सभासद आहेत. याशिवाय कौशल्य विकास प्रशिक्षणात देशात अग्रेसर असलेल्या ‘यशस्वी’ संस्थेचे  कुलकर्णी हे संस्थापक आहेत.

भारतासह  श्रीलंका, मलेशिया, फिलिपिन्स, सिंगापूर, थायलंड, व्हिएतनाम, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पापुआ न्यू गिनिआ, फिजी, हॉंगकॉंग, जपान, तैवान, बांगलादेश, पाकिस्तान, मालदीव आणि युएई (दुबई) या अठरा देशांचा या आंतरराष्ट्रीय संघटनेत समावेश आहे.

या देशांमधील विविध औद्योगिक कंपन्यांच्या मनुष्यबळ व्यवस्थापकांचे प्रश्न सामूहिक प्रयत्नातुन सोडवणे, त्यांच्यासाठी विविध आंतरराष्ट्रीय परिसंवाद आयोजित करणे, विविध देशांमधील व्यवस्थापन कार्यशैलीच्या माहितीचे आदान- प्रदान करणे, व्यवस्थापन क्षेत्राविषयीची संशोधनपत्रिका प्रकाशित करणे अशा विविध स्तरावर एपीएफएचआरएमचे कार्य  चालते.

Exit mobile version