राष्ट्रीय परीक्षा एजन्सी यांच्याकडून Neet (UG)-2020 या परीक्षेचे 12 ते 14 सप्टेंबर 2020 या कालावधीत आयोजन
Ekach Dheya
पुणे : मा.सर्वोच्च् न्यायालय, भारत यांनी त्यांच्याकडील दावा क्र. CIVIL Appeal No.11230/2018 तसेच SLP(C) No.18525 of 2018 प्रकरणी 22 नोव्हेंबर 2018 रोजी दिलेल्या न्यायनिर्णयामधील निर्देशाप्रमाणे राष्ट्रीय परीक्षा एजन्सी यांच्याकडून Neet (UG)-2020 ही परीक्षा घेण्यात येत आहे. ही Neet (UG)-2020 ही परीक्षा 13 सप्टेंबर 2020 (रविवार) या दिवशी संपूर्ण देशात एकाच वेळी घेण्यात येणार आहे. ही परीक्षा देशाला भावी काळात लागणा-या वैद्यकीय व्यावसायिकांसाठी नितांत आवश्यक अशी आहे. MHRD भारत सरकार यांच्याकडील आदेश क्र. F.No.16-16/2020 U1A 6 जुलै 2020 या आदेशात दिलेल्या मानक कार्यप्रणाली (SOP) निर्देशाप्रमाणे घेण्याची आहे.
ही परीक्षा घेत असताना सर्व केंद्रावर आवश्यक त्या सुरक्षात्मक उपाययोजना, प्रतिबंधात्मक उपाययोजना व सामाजिक अंतर (Social Distancing) राखणे गरजेचे आहे असे निर्देश देण्यात आले आहेत. 13 सप्टेंबर 2020 रोजी घेण्यात येणा-या परीक्षेसाठी उपरोक्त विहित केलेल्या मानक कार्यप्रणाली (SOP) प्रमाणे कार्यवाही करण्यासाठी दक्षता घेण्यात यावी. आपल्या जिल्हयामध्ये, शहरामध्ये या परीक्षेच्या अनुषंगाने आवश्यक असलेल्या सर्व कृती, सर्व बाबी करण्यासाठी 12 सप्टेंबर, 13 सप्टेंबर, 14 सप्टेंबर 2020 रोजी सर्व संबंधितांना परवानगी असल्याचे गृहीत धरण्यात यावे. आपल्या जिल्हयातील, शहरामध्ये नागरिकांच्या हालचालींवर काही मर्यादा असल्यास या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना देण्यात आलेले प्रवेशपत्र, ओळखपत्र हा या परीक्षेला जाण्यासाठी कराव्या लागणा-या प्रवासाबाबतचा पास ( परवाना) समजण्यात यावा. तसेच ही परीक्षा घेणा-यांमध्ये कार्यरत असलेले अधिकारी, कर्मचारी राष्ट्रीय परिषद एजन्सीकडून नियुक्त करण्यात आलेले निरिक्षक (Observers of NTA) तसेच Electronics Corporation of India Limited, Bharat Electronics Limited इत्यादी औद्योगिक क्षेत्रातील सहयोगी संस्थांमधील अधिकारी, कर्मचारी यांना ही परीक्षा पार पाडण्यासाठी 12 सप्टेंबर, 13 सप्टेंबर, 14 सप्टेंबर 2020 रोजी रितसर परवानगी देण्यात यावी. आवश्यतेप्रमाणे या प्रवासासाठी स्थानिक प्राधिकरणाने आवश्यक ते पासेस देण्याची व्यवस्था करावी.
या वैद्यकीय परीक्षेबाबतची संवेदनशीलता विचारात घेऊन योग्य ते सामाजिक अंतर राखले जाईल याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी. तसेच आपले अधिनस्त असणा-या सर्व पोलीस अधिकारी, ठाणे अंमलदार यांनी या परीक्षा केंद्राचे केंद्र अधिक्षक तसेच शहरासाठी केलेल्या संनियंत्रक अधिकारी यांना सर्वतोपरी सहकार्य करावे. या केंद्र अधिक्षक शहर संनियंत्रक यांची नियुक्ती राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA) कडून करण्यात येत आहे. ही परीक्षा सुनियोजित पध्दतीने पार पाडण्यासाठी स्थानिक स्तरावरील सर्व अधिका-यांनी त्यांच्या संपर्कात राहून योग्य सहकार्य करायचे आहे. तसेच आपल्या अधिनस्त सक्षम पोलीस अधिकारी यांनी प्रत्येक परीक्षा केंद्रावर पुरेसा बंदोबस्त ( एक वरिष्ठ निरिक्षक / एक सहायक पोलीस निरिक्षक व चार पोलीस कॉन्स्टेबल ) प्रत्येक केंद्रावर नियुक्त केला जाईल असे स्पष्ट निर्देश देण्यात यावेत. केंद्रावर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक ती दक्षता घेण्यात यावी.
राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने कोविड – 19 च्याअनुषंगाने परिक्षा घेत असताना घ्यावयाच्या दक्षता (Advisory regarding CIVID – 19 for All Functionaries ) बाबत परिपत्रकामध्ये नमूद केल्याप्रमाणे सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करण्याची दक्षता घ्यावयाची आहे. या सर्व सूचनांचे पालन आपल्या अधिकार क्षेत्रातील सर्व अधिनस्त अधिकारी कर्मचारी करती याबाबत वैयक्तिक दक्षता घेण्याबाबत पुणे विभागाचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी कळविले आहे.