नवी दिल्ली : ई-प्रशासन विषयक 22 वी राष्ट्रीय परिषद यंदा येत्या 8 आणि 9 ऑगस्टला मेघालयची राजधानी शिलाँग येथे होणार आहे. केंद्र सरकारचा प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभाग, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभाग हे मेघालय सरकारसह या परिषदेचे आयोजन करणार आहे.
ही परिषद पहिल्यांदाच ईशान्य भारतात होणार आहे. ‘डिजिटल इंडिया-उत्कृष्टतेचे यश’ अशी यंदाच्या परिषदेची संकल्पना आहे. देशभरातली 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेशातले सुमारे 450 प्रतिनिधी या परिषदेत सहभागी होण्याची अपेक्षा आहे.