Site icon साप्ताहिक एकच ध्येय

ज्येष्ठा गौरी अर्थात महालक्षमीचा सण राज्यात मोठ्या उत्साहात होतोय साजरा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ज्येष्ठा गौरी अर्थात, महालक्षम्यांचा सण आज राज्यात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. अनुराधा नक्षत्रावर गौरींचे काल घरोघरी आवाहन करण्यात आले. माहेरवाशीण असलेल्या या देवतेची काल अनेक घरात स्थापना करण्यात आली असून, आज त्यांचे पूजन केले जाते. कोकणात गौर पूजन या नावाने ही पूजा केली जात असून, विदर्भ मराठवाड्यासह अनेक ठिकाणी महालक्ष्मी या नावाने हे पूजन केले जाते.

कोकणात गोडा-धोडाचा आणि काही ठिकाणी या गौरींना समिष जेवणाचा बेत केला जातो, तर विदर्भात या दिवशी ज्वारीची आंबिल, वडे, गुळवणी, पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो. आज ज्येष्ठा गौरींचे घरोघरी उत्साहात विधिवत पूजन करण्यात येत आहे.

Exit mobile version