गरीबांची उधारी वाढवण्यापेक्षा त्यांच्या हाती पैसा कसा पडेल सरकारनं ते पहावं – राहुल गांधी
Ekach Dheya
नवी दिल्ली : गरीबांची उधारी वाढवण्यापेक्षा त्यांच्या हाती पैसा कसा पडेल सरकारनं ते पहावं, त्यामुळेच अर्थव्यवस्थेला गती मिळेल, असं काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. यावर्षीची एकत्रित मागणी लक्षात घेतली तर उपभोगतेला तीव्र धक्का बसल्याचं जाणवतं, असं प्रतिपादन कालच रिझर्व बँकेनं केलं होतं.
या पार्श्वभूमीवर राहुल गांधी म्हणाले की गेली अनेक महिने आपण सांगत होतो, त्याला रिझर्व बँकेनं ही जणू पुष्टी दिली आहे. उपभोगता वाढली तर अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, त्यासाठी गरीबांच्या हाती पैसा यायला हवा, उद्योगपतींना करसवलत देऊन काहीही फायदा नाही, असंही ते म्हणाले.