Site icon साप्ताहिक एकच ध्येय

मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करा – विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे: कोरोना संसर्गजन्य आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी मुखपटटी (मास्क) न घालता फिरणा-या नागरिकांना ५०० रुपयांच्या दंड तसेच कोणताही नागरिक सार्वजनिक ठिकाणी थुंकतांना आढळल्यास १ हजार रुपये कोरोना (कोविड-१९) संसर्गजन्य आजाराबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून दंड आकारन्याचे आदेश विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहे.

पुणे जिल्हयातील पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर व ग्रामीण भागात मोठया प्रमाणात कोरोना (कोविड १९) या संसर्गजन्य रोगाचा फैलाव वाढतो आहे. या संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी सर्व नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी प्रवास करताना, फिरतांना आपल्या तोंडावर मुखपटटी (मास्क) घालणे आवश्यक आहे. तथापि, अशा प्रकारे मुखपटटी (मास्क) न घालता नागरिक फिरतांना दिसतात.अशा नागरिकांमुळे कोरोना संसर्गजन्य आजाराचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकरता येत नाही. दंडाची रक्कम वसूल करण्याचे अधिकार पोलीस, पोलीस मित्र, आरोग्य सेवक, महापालिका कर्मचारी यांना देण्यात आले असल्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी आदेश दिले आहे.

Exit mobile version