देशातील सॉंफ्टवेअर बनवणाऱ्यांना चालना देण्यासाठी चुनौती स्पर्धेचे आयोजन
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातील स्टार्टअप्स आणि सॉंफ्टवेअर बनवणाऱ्यांना चालना देण्यासाठी चुनौती या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं आहे. माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रोनिक्स मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी काल या स्पर्धेचं दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमाद्वारे उद्घाटन केलं. या उपक्रमाकरता तीन वर्षांच्या कालावधीसाठी ९५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
या स्पर्धेव्दारे देशातील कृषी, शिक्षण, आर्थिक, पुरवठा साखळी, आदी विविध क्षेत्रातील ३०० स्टार्टअप्सची निवड करण्यात येणार असून, त्यांना बीज भांडवल म्हणून २५ लाख रुपयांपर्यंत निधी तसंच अन्य सवलती देण्यात येणार आहेत.
देशातील तरुण उद्योजकांनी पुढं यावं आणि या स्पर्धेद्वारे मिळणाऱ्या सवलतींचा लाभ घ्यावा आणि नवनवीन अॅप्स तयार करावेत, असं आवाहन रवी शंकर प्रसाद यांनी या वेळी केलं.