Site icon साप्ताहिक एकच ध्येय

देशभरातील दहा ऐतिहासिक स्मारकं सर्वसामान्य पर्यटकांसाठी 9 वाजेपर्यंत सुरु राहतील- प्रल्हाद सिंह पटेल

नवी दिल्ली : देशभरातील दहा ऐतिहासिक स्मारकं यापुढे सर्वसामान्यांसाठी सकाळी सूर्योदयापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत अशी घोषणा केंद्रीय सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी केली. याआधी ही सर्व पर्यटनस्थळे सकाळी 9 ते संध्याकाळी साडे पाच या वेळेतच सुरु असायची. सर्वसामान्‍य नागरिक आणि बाहेरुन येणाऱ्या पर्यटकांनाही निवांतपणे ही स्थळं बघता यावी यासाठी हा निर्णय घेतल्याचे पटेल यांनी सांगितले. या स्थळांमध्ये महाराष्ट्रातल्या गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडा मंदिरांचाही समावेश आहे.

10 ऐतिहासिक स्मारकांची नावे खालीलप्रमाणे:-

अनु.क्र. स्मारकाचे नाव जिल्हा राज्य
1 राजाराणी मंदीर परिसर भुवनेश्वर ओदिशा
2 दुल्हादेव मंदीर, खजुराहो छत्रपूर मध्य प्रदेश
3 शेख चिली मकबरा, थानेसर कुरुक्षेत्र हरियाणा
4 सफदरजंग मकबरा दिल्ली दिल्ली
5 हुमायुँ मकबरा, दिल्ली दिल्ली दिल्ली
6 पत्तडीकल येथील स्मारकं, कर्नाटक भागलकोट कर्नाटक
7 गोल घुमट विजयपूर कर्नाटक
8 चार्मोशी येथील मार्कंडा मंदीरं गडचिरोली महाराष्ट्र
9 मन महल, वैधशाला वाराणसी उत्तर प्रदेश
10 रानी-की-वाव पाटण गुजरात

 

Exit mobile version