भंडारा, नागपूरसह पूर्व विदर्भातल्या अनेक जिल्ह्यात पूरस्थिती
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भंडारा जिल्ह्यात गेल्या २० आणि २१ ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सर्व नुकसानग्रस्तांना तातडीनं मदत देण्याचे निर्देश, विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहेत.
पूरबाधित गावांमधल्या मदत आणि बचाव कार्याचा त्यांनी काल आढावा घेतला. अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज, संबंधित अधिकाऱ्यांनी या बैठकीत सादर केला. जिल्ह्यात, ३५२ गावातल्या ६ हजार ८४४ शेतकऱ्यांच्या, ९ हजार १३१ हेक्टर शेतीमधल्या पिकांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे.