ऑनलाइन शिक्षण घेण्यासाठी साधने नसणाऱ्या विद्यार्थ्यांना गावातल्या समाज मंदिरात शिक्षण
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून पासून बंद असलेल्या वाशिम जिल्ह्यातल्या शाळांमधल्या विद्यार्थ्यांना १ जुलैपासून ऑनलाइन पद्धतीनं शिक्षण दिलं जात आहे. जिल्ह्यातली एकूण विद्यार्थी संख्या २ लाख ६६ हजार ९४८ आहे. यापैकी अद्याप ६७ हजार १८७ विद्यार्थ्यांकडे अँड्रॉइड मोबाइल अथवा अन्य ऑनलाईन शिक्षणाचे साधन उपलब्ध नाही.
या बाबीची दखल शिक्षण विभागाने घेतली आहे. ज्यांच्याकडे ऑनलाईन अभ्यासाची सोय नाही त्या विद्यार्थ्यांचे दहा – दहाचे गट करून संबंधित शिक्षकांनी सुरक्षित सामाजिक अंतराचे पालन करून शाळेसह गावातल्या समाज मंदिर अथवा मोकळ्या जागांवर शिकवावं, अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत.